in

कोण होणार महाराष्ट्राच्या मुख्य सचिव ? 2 अधिकाऱ्यांमध्ये जोरदार चुरस

महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव संजीव कुमार येत्या 28 तारखेला निवृत्त होत आहेत. रिक्त झालेल्या मुख्य सचिवपदावर कुणाची नेमणूक होतेय या गोष्टीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. या पदासाठी राज्याचे मुख्य सचिव म्हणून गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्य सचिव पदासाठी कुंटे यांच्या बरोबर प्रवीणसिंह परदेशी यांच्या देखील नावाची जोरदार चर्चा आहे. येत्या रविवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत किंवा त्याआधी सीताराम कुंटे यांच्या मुख्य सचिवपदावरील नियुक्तीचा आदेश काढला जाईल, अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. प्रवीणसिंह परदेशी यांच्याकडे एमएमआरडीए व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्याची चर्चा देखील सध्या वरिष्ठ पातळीवर सुरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सोने, चांदीच्या किंमतीत घट

Oscar शर्यतीत आणखी एका भारतीय चित्रपटाची एण्ट्री