in

नऊ महिन्यानंतर चीनने का घेतली माघार?

लोकशाही न्यूज नेटवर्क

चीनच्या पीएलएने भारतीय सैन्यावर हल्ला केला. भारतीय जवानांनी सुद्धा यावेळी जशास तसे प्रत्युत्तर देत चीनला धडा शिकवला. यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले. दोन्ही देशांमध्ये वरिष्ठ सैन्य पातळीवर चर्चेच्या नऊ फेऱ्या होऊनही कुठलाही तोडगा निघू शकला नाही. अचानाक बुधवारी सकाळपासून मुख्य कळीचा मुद्दा असलेल्या पँगाँग टीएसओ सरोवर परिसरातून सैन्य माघारी सुरु झाली.


मागच्यावर्षी मे महिन्यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पूर्व लडाख सीमेवर अतिक्रमण केल्यानंतर भारत-चीनमध्ये सीमा वादाला सुरुवात झाली. १५ जूनला गलवान खोऱ्यात चीनने आपला खरा चेहरा दाखवून दिला. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षामुळे परिस्थिती तापली आणि वाद आणि वाद शिघेला पोहचला आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहे मात्र अचानक चीन कसा माघारीसाठी तयार झाला? अशा चर्चा सुरू आहेत.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि एनएसए अजित डोवाल यांनी चीनमधील आपल्या समपदस्थांची चर्चा केली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये सैन्य पातळीवर सहमती झाली. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार पूर्व लडाखबाबतच्या आपल्या भूमिकेवर भारत ठाम राहिला. चीनचा कुठलाही दावा मान्य करायचा नाही, आपली एक इंचही भूमी सोडायची नाही, हा भारताचा निर्धार कायम होता. त्यानंतर चीनला अखेर नमते स्वीकारुन माघारी फिरावे लागले, असे सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Petrol-Diesel price Today: सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

नववधूचा बापमाणूस; आहेराचे 11 लाख केले रुग्णालयाला दान…