राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यापरिषदत संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं. संजय राठोड प्रकरणी विरोधकांनी गलिच्छ राजकारण सुरू केलं आहे. या प्रकरणी निष्पक्षपाती तपास झाला पाहिजे, असे मत मुख्यमंत्र्यांनी मांडले. परंतु यावेळी विरोधक दीव दमणच्या खासदाराच्या आत्महत्येवर गप्प का? असा घणाघाती सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केला .
काही दिवसापूर्वी दीव दमणचे अपक्ष खासदार मोहन डेलकर याचा मृतदेह मुंबई हॉटेलमध्ये आढळला होता. या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सुद्धा मिळाली होती. या पाश्वभूमीवर मोहन डेलकरांच्या आत्महत्येमागे कुणाचा हात? आत्महत्येआधीच्या चिठ्ठीत कोणत्या नेत्यांची नावं ? असे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विचारला आहे.
दीव दमणच्या खासदाराच्या आत्महत्येचे प्रकरण :
काही दिवसांनपूर्वी दीव दमणचे अपक्ष खासदार मोहन डेलकर हे मुंबईतील मारिन ड्राईव्ह हॉटेल मध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता. त्यांच्या मृतदेहाजवळ गुजरातीमध्ये लिहलेली एक चिट्ठी सुद्धा सापडली होती. पोलिसांकडून आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मृतदेहाच्या जवळ सापडलेल्या चिट्ठीमध्ये काही बड्या नेत्याची नावे असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. १९८९ मध्ये मोहन डेलकर हे खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेले होते. भारतीय नव शक्ती पार्टीचे ते खासदार राहिले होते. २००९ त्यांनी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला होता. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे हे प्रकरण अजूनच तापणार का ? हे पाहावे लागेल .
Comments
Loading…