in ,

‘दूध का दूध, पाणी का पाणी करावे!’; अनिल देशमूखांची मुख्यमंत्र्यांना विनंती

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या प्रकरणात विरोधकांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली होती. त्यामुळे आता निवृत्त न्यायमूर्तींमार्फत गृहमंत्र्यांची चौकशी केली जाणार आहे. या निर्णयानंतर गृहमंत्री देशमुख यांनी ट्विट करत ‘दूध का दूध, पाणी का पाणी करावे’, असे म्हटले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. या आरोपानंतर भाजप नेत्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर रान उठवलं होतं. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुखांना क्लीन चिट देत चौकशीची किंवा राजीनाम्याचीही गरज नसल्याचे सांगत आरोप फेटाळले होते.

राज्य सरकार या प्रकरणात एक पाऊल मागे घेत बुधवारी रात्री अखेर निवृत्त न्यायमूर्तींमार्फत गृहमंत्र्यांची चौकशी केली जाणार असल्याचे जाहीर केले. या निर्णयानंतर गृहमंत्री देशमुख यांनी ट्विट केलं. “मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते”, असं ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अभिनेत्री आलिया भट्ट आणि संजय भंसाळीला बजावलं समन्स

‘तुर्तास लॉकडाउन नाही, निर्बंध कठोर करणार’