in ,

अंकिता लोखंडे लवकरच विवाहबद्ध होणार?

छोट्या पडद्यावरची अतिशय लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अंकिता सध्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात दिसत आहे. अंकिता तिच्या प्रोफेशनल लाइफ प्रमाणेच तिच्या खासगी आयुष्याबद्दलमुळे चर्चेत असते.

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर तिचा बॉयफ्रेंड विकी जैनने तिला मानसिक पाठिंबा दिला होता. येत्या काळात अंकिता आणि विकी लग्नबंधनात अडकणार आहेत अशी कुणकुण चाहत्यांना लागली आहे. तशी तयारी देखील सुरू झाली आहे असे दिसते आहे. अंकिताने काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. या फोटोत अंकिताच्या घराचे काम सुरू असल्याचे दिसून आले. या घरात ती एक नवीन सुरूवात करणार आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोंमुळे आता लवकरच विकी जैन सोबत विवाहबंधनात अडकणार आहे या चर्चांना आणखीन वाव मिळाला आहे.

त्यामुळे आता घराच्या शुभेच्छा देण्यासोबतच लग्नाची तारीख कधी जाहीर करणार? असे प्रश्न चाहते अंकिताला विचारताना दिसले. अंकिता तिचा बॉयफ्रेंड विकी जैन सोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता ही जोडी कधी विवाहबद्ध होणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

एनसीबीनं माझ्या जावयाला खोट्या प्रकरणात फसवलं – नवाब मलिक

Petrol Diesel Price Today | आज परत सर्वसामांन्यांच्या खिशाला कात्री?