लोकशाही न्यूज नेटवर्क | संदीप गायकवाड
वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी आतापासूनचं रणनीती आखली जात आहे. महापालिकेवर बविआच्या एकहाती सत्तेला खिंडार पाडण्यासाठी भाजपा, महाविकासआघाडीसह मनसेने कंबर कसली आहे.
बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा तथा आमदार हितेंद्र ठाकूर यांची एकहाती सत्ता आहे. महापालिकेत 115 नगरसेवका पैकी 107 नगरसेवक हे ठाकुरांच्या बविआचे आहेत. 5 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. 1 भाजपा, 1 मनसे आणि 1 अपक्ष नगरसेवक असे 8 नगरसेवक ईतर पक्षाचे आहेत.
भाजपा कडून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस, महाविकास आघाडी कडून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आ रवींद्र फाटक तर मनसे कडून पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर व्ह्यूरचना आखण्यात आली आहे.
लॉकडाऊन दरम्यान केलेल्या कामाची पोचपावती घेऊन यंदाच्या निवडणुकीत बविआ मैदानात उतरणार असून सर्वच 115 जागा जिंकण्याचादावा बविआ कडून करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत बविआचा गड अबाधित राहतो की भाजप अथवा मविआची सत्ता येतेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Comments
Loading…