in

राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करणार, मंत्रिमंडळाचा निर्णय

Computer image of a coronavirus

राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यास व यासंदर्भातील विधेयक 2021 विधिमंडळात मांडण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्रात असलेले उद्योग समूहांचे मोठे जाळे व रोजगाराच्या प्रचंड संधी विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील विविध शहरांमध्ये प्रामुख्याने महानगरांमध्ये बँकिंग, वित्तीय सेवा, विमा, औषधे, आतिथ्य, तेल, वायू, खनिज, एफएनसीजी, ऊर्जा, यासारख्या अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच खासगी कंपन्यांची मुख्य कार्यालये कार्यरत आहेत. उद्योगांच्या मागणीनुसार तांत्रिक क्षमता आणि विविध कौशल्यप्राप्त असे मनुष्यबळ निर्माण व्हावे, असा कौशल्य विद्यापीठ स्थापनेचा उद्देश आहे.

राज्यात सहा विभागीय ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलेन्स उभारण्याचे ही प्रस्तावित आहे. ही केंद्रे राज्य कौशल्य विद्यापीठाची विभागीय केंद्रे म्हणून काम पाहतील. विद्यापीठाने मान्य केलेले अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी राज्यातील सर्व औ्द्योगिक प्रशिक्षण संस्था, सर्व कौशल्य प्रशिक्षण संस्था या राज्य सार्वजनिक कौशल्य विद्यापीठाशी संलग्न होऊ शकतील. विद्यापीठ प्रशासन आणि इमारतीच्या खर्चापोटी दरवर्षी सुमारे 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अकृषिक कराला भाजपाचा विरोध, सह्याद्री अतिथीगृहासमोर निदर्शने

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; कुणालाही पाठीशी घालणार नाही- अजित पवार