in

एका आठवड्यात ब्लॅक फंगसचं औषध देणार; स्वामी रामदेवांचा मोठा दावा

आपण लवकरच ब्लॅक फंगसवरील औषध घेऊन येत आहोत, असा दावा योग गुरू स्वामी रामदेव यांनी केला आहे. ”अनेक प्रकारचे वाद उद्भवले असले तरी, मी 18 तास सेवाकार्य करतच आहे आणि एका आठवड्याच्या आत ब्लॅक फंगस, येलो फंगस आणि व्हाइट फंगसवरील इलाज आयुर्वेदाच्या माध्यमाने देणार आहे. काम झाले आहे आणि प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे,” असे स्वामी रामदेव यांनी सांगितले.

”आयएमए ना कुठली साइंटिफिक व्हॅलिडेशनची बॉडी आहे, ना त्यांच्याकडे कुठली लॅब आहे, ना त्यांच्याकडे कुणी वैज्ञानिक आहेत. आयएमए एक एनजीओ आहे,” असेही रामदेव यांनी म्हटले आहे. योग आणि आयुर्वेदाचा अनादर झाला आहे. आयएमए सातत्याने बल्ब, पेंट आणि साबनाचे प्रमाणीकरण करण्याचे काम करत आहे. तर कोरोनिलला अप्रमाणिक म्हणून आयुर्वेदाची खिल्ली उडवली जात आहे. यावरून वाद आहे, मी असे बोललो आहे, असे स्वामी रामदेव म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुखावर खंडणीचा गुन्हा दाखल

Lockdown | जाणून घ्या मुंबई महानगरक्षेत्रात आजपासून काय सुरू अन् काय बंद