in

मंत्री यशोमती ठाकूर यांची कन्या आकांक्षा उतरणार राजनीतीच्या आखाड्यात ?

अमरावती : सुरज दाहाट | राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांची मुलगी आकांशा राजकारणात सक्रिय झाली आहे,आकांशा हिने आपल्या आईचा अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदार संघातील दापोरी खुर्द गावात जाऊन आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत करून सांत्वन भेट दिली, त्यामुळे अमरावती जिल्ह्यात मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मुलीने राजकारणात ऍन्टी केली असल्याची जबरदस्त चर्चा आहे,आकांशा राजनीतीच्या आखाड्यात उतरली असून राजकीय धडे गिरिवायला तिने सुरवात केली आहे.

राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणात घराणेशाहीच राजकारण बघायला मिळतं, वडील,आई,भाऊ व बहीण राजकारणात असली तर त्यांच्या कुटुंबातील लोक राजकीय वासरा चालवतात हे चित्र आहे,तसा राजकीय वारसा चालवतात तर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची मुलगी कुमारी आकांक्षा ही देखील राजकारणात सक्रिय झाली आहे, आज मंत्री यशोमती ठाकूर यांच्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदार संघातील दापोरी खुर्द या गावात आकांक्षा ठाकूर पोहोचल्या येथील रवींद्र देविदास खरासे यांनी नुकतीच आर्थिक संकटातून आत्महत्या केली आहे.

त्यांच्या आत्महत्येनंतर आभाळ कोसळलेल्या या कुटुंबाचा आकांक्षा ठाकूर हिने धीर देत आर्थिक मदत केली,यशोमती ठाकूर ह्या मंत्री असल्याने त्यांच्या कामाचा व्याप जास्त आहे त्यामुळे त्यांच्या अनुपस्थित त्यांची मुलगी आकांशा ही आपल्या आईच्या मतदार संघात भेटी देत असतात त्यामुळे यशोमती ठाकूर यांची मुलगी आता आपल्याचा राजकीय वारसा चालवणार हे निश्चित झाले आहे, तर यशोमती ठाकूर यांना देखील राजकीय वारसा आहे त्यांची आजी ही पहिला महिला जिल्हा परिषद सदस्य होती त्या नंतर वडील भय्यासाहेब ठाकूर आमदार होते त्यांनंतर यशोमती ठाकूर ह्या सलग तीन वेळा आमदार म्हणून विजयी झाल्या आहेत, तर ठाकूर कुटुंबातील राजकीय वारसा म्हणून यशोमती ठाकूर यांची मुलगी आकांशा ठाकूर ही राजकीय धडे गिरवत असून आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत आकांशा प्रवेश करून निवडणूक लढवणार का याचे कडे लक्ष लागले आहेत

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इसापूर धरणाचे 13 गेट उघडून पाण्याचा विसर्ग

मुंबईकरांसाठी सर्वात आनंदाची बातमी; कोरोना महामारी सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच एकही मृत्यू नाही