in

पेट्रोल-डिझेलच्या किंमती निम्म्यापर्यंत येणार? पेट्रोलियम मंत्र्यांचे संकेत

पेट्रोल-डिझेलच्या किंमती सध्या गगनाला भिडल्या असून त्यावरून केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांमध्ये जुंपलीही आहे. दरम्यान, पेट्रोलियम उत्पादनांना गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सच्या (GST) कक्षेत घेतलं, तर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळू शकतो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तसे संकेतही दिले आहेत. जीएसटीचा सर्वोच्च दरही पेट्रोलियम उत्पादनांना लागू केला, तरी पेट्रोल-डिझेलच्या किंमती सध्याच्या तुलनेत निम्म्यापर्यंत येऊ शकतात.

सध्या पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकार उत्पादन शुल्क आकारतं आणि राज्य सरकारं व्हॅट आकारतात. हे दोन्ही कर इतके आहेत, की 35 रुपये मूळ किमतीचं पेट्रोल वेगवेगळ्या राज्यांत 90 ते 100 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचलं आहे. 23 फेब्रुवारी रोजी दिल्लीत पेट्रोलची किंमत 90.93 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 81.32 रुपये प्रति लिटर होती. त्यामध्ये केंद्र सरकारने अनुक्रमे 32.98 रुपये प्रति लिटर आणि 31.83 रुपये प्रति लिटर एवढं उत्पादन शुल्क लावलं आहे.

तसं झालं, तर काय होईल?

पेट्रोलियम उत्पादनांचा समावेश जीएसटीमध्ये झाला, तर देशभरात सर्वत्र या इंधनांच्या किमती एकसारख्या असतील. जीएसटी परिषदेने कमी टक्केवारीचा पर्याय निवडला, तर किमती कमी होऊ शकतात. भारतात सध्या जीएसटीचे 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के असे चार प्राथमिक दर आहेत. सध्या केंद्र आणि राज्य सरकारं उत्पादन शुल्क आणि व्हॅटअंतर्गत जवळपास 100 टक्क्यांहून अधिक कर वसूल करत आहेत.

  • 5 टक्के जीएसटी लावला तर पेट्रोल प्रति लिटर 37.57 रुपये, तर डिझेल 38.03 रुपये होईल.
  • 12 टक्के जीएसटी – पेट्रोल – 40.07 रुपये, तर डिझेल – 40.56 रुपये
  • 18 टक्के जीएसटी – पेट्रोल – 42.22 रुपये, डिझेल – 42.73 रुपये
  • 28 टक्के जीएसटी – पेट्रोल – 45.79 रुपये, डिझेल – 46.36 रुपये

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

टि्वटरवर ट्रेण्ड होतंय ‘मोदी जॉब दो’

पुढील दहा दिवस मुंबई शहरासाठी करो या मरो; कोरोना टास्क फोर्स