राज्यात पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्यसरकारमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी संघर्ष उफाळण्याचे कारण वेगळे आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोलेंनी राजीनामा दिला होता. त्यामुळे नवीन अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेणार?, असा थेट सवाल राज्यपालांनी राज्य सरकारला विचारलाय. आधीच राज्यपाल नियुक्त रिक्त जागांवरून दोघांमध्ये वाद असताना आता राज्यपालांनी थेट सवाल केल्याने पुन्हा सामना रंगण्याची शक्यता आहे.
विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर, नवीन अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेणार?, असा थेट सवाल राज्यपालांनी पत्रातून राज्य सरकारला विचारलाय. राज्यपाल नियुक्त रिक्त असल्याने 12 जागांवरून आधीच ठाकरे सरकार आणि राज्यपालांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. त्यातच राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा उपस्थित केल्यानं ठाकरे सरकार आणि राज्यपालांमधील वाद शिगेला पोहोचण्याची चिन्हे आहेत.
विशेष म्हणजे राज्यपालांच्या या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे आता राज्य सरकारही राज्यपालांना लवकरच उत्तर देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.
Comments
Loading…