in

कल्याण-डोंबिवलीत नियमांचं उल्लंघन करून वाईन शॉप सुरूच

राज्यात कोरोनसंख्या झपाट्याने वाढत आहे. झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येला पाहता कल्याण-डोंबिवलीमध्ये आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

आज होळीच्या दिवशी दुपारनंतर वाईन शॉपवर तळीरामांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. येथे ना सोशल डिस्टन्सिंग होतं ना कोणाच्या तोंडावर मास्क. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असताना पालिकेने वाईन शॉपमात्र चालूच होते.

या प्रमाणेच आठवडी बाजारांमध्ये मोठ्या प्रणामात गर्दी पाहायला मिळतेय. पालिका प्रशासन याकडे ही दुर्लक्ष करतंय. कल्याण-डोंबिवलीत रोज वाढणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास 1000 च्या घराजवळ पोहोचली आहे.
कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाचा कहर कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट तयार होत आहेत. कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज 941 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नवनीत राणा उतरल्या व्हॉलीबॉलच्या मैदानात… रंगला आमदार विरुद्ध खासदार सामना

संजय राऊतांच्या गृहमंत्र्यांवरील विधानावरून ‘सामना’; हसन मुश्रीफांनी केली नाराजी व्यक्त