in ,

मोबाईल वाचवताना रिक्षातून पडून महिलेचा मृत्यू

मोबाईल चोरांचा प्रतिकार करत असताना रिक्षातून पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ठाण्यातील तीन हात नाका परिसरात घडली आहे. मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव कन्मिला रायसिंग आहे.

गुरूवारी रात्री आठच्या दरम्यान ठाण्याच्या दिशेने जाणारी रिक्षा तिने पकडली. रिक्षा तीन हात नाका सिंग्रलवर थांबली असता मागून दोन दुचाकीस्वरांनी तिचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला त्यांचा प्रतिकार करताना ही महिला रिक्षातून खाली पडली, डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यु झाला.

या प्रकरणानंतर ठाण्यातील नौपाडा पेलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून मोबाईल चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. घडलेल्या घटनेबद्दल नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जातेय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर अंगाला चिकटू लागल्या वस्तू… !

मनुष्यवस्तीत शिरला बिबट्या; सीसीटीव्हीत कैद