in

केडीएमसीच्या कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग

कल्याण -डोंबिवली महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये एका पॉझिटिव्ह महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी वॉर्डबॉय विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मात्र पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

राज्यात पुन्हा कोरोनाने डोक वर काढाल आहे. त्यामुळे बंद करण्यात आलेली कोविड सेंटर पुन्हा सुरु झाली आहेत. कल्याण -डोंबिवली महापालिका हद्दीत सुद्धा वाढती रुग्णसंख्या पाहता आर्ट गॅलरी येथील कोविड सेंटर खुले करण्यात आले. दरम्यान या कोविड सेंटरमध्ये रविवारी एका कोरोना बाधित महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले.

कोव्हीड सेंटरमध्ये वार्ड बॉयची ड्युटी करणाऱ्या श्रीकांत मोहिते या नराधमाने सायंकाळच्या सुमारास संधीचा फायदा घेत महिलेसोबत अश्लील चाळे केले. या प्रकरणाची माहिती पिडीत महिलेने आपल्या पतीला दिली. पतीने या विरोधात पोलीसात धाव घेतली. त्यामुळे बाजारपेठ पोलिस ठाण्यात श्रीकांत मोहिते विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान वार्ड बॉय महिलांच्या विभागात गेलाच कसा? सुरक्षा यंत्रणा कुठे होत्या असे सवाल यानिमित्त उपस्थित होत आहेत. या घटनेने पुन्हा एकदा कोव्हीड सेंटर मधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विकी कौशल करणार मानुषीसोबत रोमान्स !

डॉ. आंबेडकर तंत्रशास्‍त्र विद्यापीठाच्‍या कुलगुरूंचा तडकाफडकी राजीनामा