in

कौतुकास्पद! महिला सरपंचानं मंगळसूत्र गहान ठेऊन भागवली गावाची तहान

वीज वितरण कंपनीने 84 हजार रुपयांचा दंड ठोठावला

धुळे जिल्ह्यात दभाशी गावामध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. ही पाणी टंचाई सोडवण्यासाठी लोकनियुक्त सरपंच नंदिनी पाटील यांनी थेट मंगळसूत्र गहान ठेऊन गावाची तहान भागवली आहे. त्यांच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त होत असून कोतूकही केले जात आहे.

दभाशी गावच्या लोकनियुक्त सरपंच नंदिनी पाटील यांनी आमदार जयकुमार रावल यांच्या माध्यमातून गावाचा पाणीप्रश्न सोडवला.गावामध्ये जलशुद्धीकरण प्रकल्पही उभारला. मात्र, प्रकल्पाच्या तपासणीसाठी त्यांनी अनधिकृत वीज जोडणी घेतली नव्हती. त्यामुळे वीज वितरण कंपनीला याची कुणकुण लागली होती.

वीज वितरण कंपनीने 84 हजार रुपयांचा दंड ठोठावत दभाशी गावाची वीज जोडणी खंडित केली.आता करायचं काय असा प्रश्न ग्रामस्थांसमोर होता.आधीच कोरोनाच्या महामारीमध्ये पिळून निघालेल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पैशांची जुळवाजूळव केली होती. त्यामुळे 84 हजार रुपये भरायचे कुठू हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता.

यावर गावाच्या सरपंच नंदिनी पाटील यांनी धाडसी निर्णय घेत, क्षणाचाही विलंब न लावता आपले सौभाग्याचे लेणे आणि 2 सोन्याच्या अंगठ्या सराफाकडे गहाण ठेवल्या. दागिने गहाण ठेवलेल्या पैशातून दंड भरत गावाचा पाणीपुरवठा सुरळीत केला.त्यामुळे गावाचा पाणी टंचाईचा प्रश्न सुटला आहे. तसेच पाणीटंचाई दूर केल्यानं ग्रामस्थ आनंदी आहेत.लोकसेवेचं एक आदर्श उदाहरण ठेवल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“इटालियन डोहाळे लागल्याने शिवसेनेकडून राममंदिराची बदनामी”

भाईंदरमध्ये घरातील सिलिंगचा भाग कोसळल्याची घटना; एकाचा दुर्दैवी मृत्यू