in

…तर असा आहे जागतिक टपाल दिनाचा इतिहास आणि महत्त्व!

टपाल सेवा आणि त्यातील विभागांविषयी लोकांना जागरुक करण्यासाठी दरवर्षी 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन किंवा ‘वर्ल्ड पोस्ट डे’ हा जगभरातून साजरा केला जातो. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या काळात आजही लोकांचा टपालसेवेवरचा विश्वास कायम आहे. चला, तर पाहूयात या दिवसाचा इतिहास आणि साजरा करण्याचं महत्व…

इतिहास काय? :

युनिव्हर्सल पोस्टल युनियन (युपीयु) ची उभारणी करण्यासाठी 1874 मध्ये ‘बर्न’ (स्विर्झलंड) येथे 22 देशांनी मिळून करारावर सही केली. पुढे टोकियोत 1969 मध्ये आयोजित संमेलनात जागतिक टपाल दिनाची घोषणा केली गेली. त्यानंतर 1 जुलै 1876 ला भारत ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन’ चा सदस्य होणारा पहिला आशियाई देश ठरला होता.


● जसा काळ बदलला तसे जगातील सर्व टपाल सेवांनी त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये आवश्यक बदल केले आहेत.
● नवीन तंत्रज्ञानासह टपाल सेवांनी स्वत: ला अधिक जलद केले आहे.
● डाक, पार्सल, पत्र हे एक्सप्रेसने जाण्याची सेवा सुरु झाली.
● या बदलांना सुरुवात जाळ्याने सर्वच स्थरावर तांत्रिक बदल करण्यात आले.
● आता ऑनलाईन पोस्टल देवाण- घेवाणीवरही लोकांचा विश्वास वाढला आहे.
● ‘युपीयु च्या एका सर्व्हेमध्ये अशी माहिती समोर आली की, जगभरातून आजच्या घडीला 55 पेक्षा जास्त प्रकारच्या ई- पोस्टल सेवा उपलब्ध आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुलावर गळफास घेऊन संपवले आयुष्य

नागपुरात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; चौघांना अटक