in

Deepali Chavan Suicide |’विशाखा समिती’ कार्यरत करण्याचे यशोमती ठाकूरांचे निर्देश

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यानाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल वनपरिक्षेत्रातील आरएफओ दीपाली चव्हाण यांना ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखले जायचे. त्यांनी काल सायंकाळी आपल्या शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असून अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी त्यात म्हटले आहे. आता हे प्रकरण अजूनच तापत चालेले आहे. वनक्षेत्र संचालक रेड्डी व dfo प्रमोद शिवकुमार यांच्यावरही गुन्हे दाखल करा या मागणीसाठी शवविच्छेदन गृहाबाहेर दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबीयांचे आंदोलन सुरू केले आहे.

याच पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्याचा प्रमाणे या आत्महत्या प्रकरणात दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश यशोमती ठाकूर यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना यांना दिले आहेत. तसेच यावेळी ‘विशाखा समिती’ तात्काळ कार्यरत करण्याचे निर्देश देखील त्यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

gold and silver rate | पाहा सोने चांदी आजचा भाव

पंढरपूर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत बंडखोरी, महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसेंचा उमेदवारी अर्ज