in

कोरोनामुळे श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील यात्रा रद्द

राज्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णाची संख्या वाढते. त्यामुळे श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी बुधवार दि. 10 ते 12 मार्चपर्यंत जिल्हाधिकारी यांनी संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी दिली.

भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्त दर्शनासाठी येण्याची शक्‍यता आहे. यामुळे गर्दी होऊन करोनाचा प्रसार वाढू शकतो. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात कोणत्याही व्यक्तीला येथील कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्य मनाई करणारा आदेश लागू केला आहे.

भाविकांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे येऊ नये. तसेच श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने यात्रा नियोजन करण्यात येऊ नये. यात्रा कमिटीच्या वतीने ऑनलाइन दर्शन प्रणालीचा वापर करुन भाविक भक्तांना मोबाईल ऍपद्‌वारे दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात यावा. पाच आणि पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार नाहीत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नागपूर जिल्ह्यात १४ मार्चपर्यंत निर्बंध कायम

तुमच्या शाैर्याला सॅल्यूट, मुख्यमंत्री ठाकरे यांचा जखमी जवानाला फोन