in

Yavatmal Bus | पुराच्या पाण्यात एसटी वाहून गेली; आणखी एक मृतदेह हाती

मुसळधार पावसामुळं एसटी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात बुडालेली बस बाहेर काढण्यात आली.

नांदेड येथून नागपूरकडे जाणाऱ्‍या हिरकणी बसच्या चालकाला नाल्याला आलेल्या पुराचा अंदाज न आल्याने बस नाल्यात वाहून गेली होती. त्यात आता आणखी एक मृतदेह हाती लागला. बेपत्ता असलेला एक मृतदेह नाल्यापासून दीड किमी अंतरावर आढळला असून मृतदेह हा बस चालकाचा असल्याची महिती मिळत आहे.

नागपूर आगाराची एम एच १४.बी.टी.५०१८ ही बस वाहून गेल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. पुलावरुन पाणी वाहत असतानाही एसटी चालकाने नको ते धाडस करत बस पुलावरुन नेली. त्यामुळं पाण्याच्या प्रवाहात ही बस वाहून गेली. ही बस नागपूर- नांदेड काल सकाळी नागपूर वरून निघाली होती. नागपुरातील घाट रोड डेपोची ही बस होती. काल रात्री ती नांदेड येथे पोहोचली. आज सकाळी ७ वाजता नांदेड वरून नागपूरकडे निघाली होती. उमरखेड पुसद दरम्यान सकाळी ८ वाजता च्या सुमारास ही बस पुरात वाहून गेली आहे.

What do you think?

-3 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जागतिक हृदय दिनानिमित्त मुंबई पालिकेकडून आजपासून जनजागृती

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीचे समन्स