in

महाराष्ट्रात ‘या’ 22 जिल्ह्यांत पावसाची शक्यता, येलो अलर्ट जारी

महाराष्ट्रात आगामी दोन दिवसामध्ये ढगांच्या गडगडाटांसह पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचा परिणाम म्हणून हा पाऊस होईल, अशी माहिती हवामान खात्याच्या पुणे विभागाचे वैज्ञानिक के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल.

विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यातील 22 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. आज राज्यातील 22 जिल्ह्यांना हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने आज नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, बुलडाणा, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 22 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी सध्या तापमानात वाढ होत आहे. एक ते दोन दिवस काही भागांत पावसाळी स्थिती राहणार आहे. त्यानंतर हवामान कोरडे होईल. उत्तरेकडील राज्यात दोन दिवस पाऊस होणार असून, तेथेही नंतर कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण होणार आहे. परिणामी राज्यातील काही भागात दिवसाच्या कमाल तापमानात आणखी काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. शनिवारी राज्यातील उच्चांकी कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ३६.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Happy Anniversary | माधुरी दीक्षित नेने यांच्या लग्नाचा आज 22 वा वाढदिवस

केरळमध्ये पावसाचे रौद्र रूप