in , ,

‘आज तुमचे हे चांगले खेळले’; ऋतुराजचा खेळ पाहून चाहत्यांच्या सायलीला शुभेच्छा

रविवारी दुबई येथे झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने विजय प्राप्त करून आयपीएल-२०२१च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऋतुराज गायकवाड, राॉबिन उथप्पा आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचे या विजयात मोलाचे योगदान आहे.

ऋतुराज आणि रॉबिनने ११० धावांची भागीदारी करत चेन्नईला चांगल्या स्तरावर पोहोचवले. ऋतुराजचा खेळ पाहून चाहत्यांना आनंद झाला असून त्यांनी अभिनेत्री सायली संजीवच्या पोस्टवर कमेंट करण्यास सुरुवात केली.

सायली संजीवने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. तिच्या या व्हिडीओवर ऋतुराजच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत ‘आज तुमचे हे चांगले खेळले’ असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युझरने, ‘सायली दीदीला ऋतुराज आवडत असेल.. चांगला खेळला भावा तू आणि एकदा सायली दीदीला भेटून घे’ असे म्हटले आहे.

ऋतुराजने सायलीच्या एका फोटोवर ‘वाह’ अशी कमेंट केली होती आणि सायलीने त्यावर हार्ट ईमोजीचा वापर केला होता. तेव्हापासून ऋतुराज आणि सायलीच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता ऋतुराजचा खेळ पाहून चाहत्यांनी सायलीच्या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“…अशा लोकांपासून देशाला सावध राहायला हवं”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला टीकाकारांवर निशाणा

महिलांच्या मूलभूत हक्कांवरून संयुक्त राष्ट्रानं तालिबानला सुनावलं