in

भारताच्या ‘या’ तडाखेबाज फलंदाजाने घेतली निवृत्ती

गोलंदाज आर विनय कुमारच्या पाठोपाठ तडाखेबाज फलंदाज युसूफ पठाणनेसुद्धा क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आक्रमक फलंदाज युसूफ पठाणने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. युसूफने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. यूसूफने त्याच्या कुटुंबियांचे, टीम इंडियातील सहकाऱ्यांचे, संघ व्यवस्थापनाचे, सर्व चाहत्यांच्याचे आणि त्याच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. त्यानं भारताकडून ५७ वन डे व २२ ट्वेंटी-२० सामने खेळले.

युसुफ पठाणच्या नावावर आयपीएलची तिन जेतेपदं आहेत. त्यापैकी एक जेतेपद हे त्यानं राजस्थान रॉयल्सकडून ( २००८), तर दोन कोलकाता नाइट रायडर्सकडून ( २०१२ व २०१४) पटकावलं. २००८च्या पहिल्याच आयपीएलमध्ये त्यानं RRकडून ४३५ धावा कुटल्या आणि जून २००८मध्ये त्याला भारताच्या वन डे सघात संधी मिळाली. आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम आजही युसूफच्या नावावर आहे.

युसूफची पोस्ट
”आजही मला पहिल्यांदा भारताची जर्सी परिधान केल्याचा दिवस आठवतोय… ती केवळ जर्सी नव्हती, तर माझे कुटुंब, मित्र, प्रशिक्षक आणि भारतातील प्रत्येक चाहत्यानं माझ्या खांद्यावर सोपवलेली जबाबदारी होती. भारतासाठी दोन वर्ल्ड कप जिंकणे आणि सचिन तेंडुलकरला खांद्यावर उचलून घेणे, हे कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण आहेत,”असे त्यानं लिहिले. त्यानं सर्वांचे आभार मानले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘या’ ५ राज्यात वाजणार निवडणुकांचे बिगुल

इंधन दरवाढी संदर्भात केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचा अजब तर्क