in

कोरोनाग्रस्तांसाठी युवराज सिंगची धाव

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेला आहे. युवराजने ‘यू वी कॅन’ या फाउंडेशनच्या मदतीने हिमाचल प्रदेशमधील दोन शहरात मदत पाठवली आहे.

युवराजने ‘यू वी कॅन’ या फाउंडेशनच्या मदतीने भारतात कोरोना रूग्णांसाठी विविध रूग्णालयात एक हजार बेड देण्याची घोषणा केली होती. या मोहिमेतून मदतीचा एक हिस्सा हिमाचल प्रदेशमधील थियोग आणि रोहरू या दोन शहरांमध्ये पाठविला जात असल्याची माहिती युवराजने ट्विटद्वारे दिली आहे.

”कोविडच्या कठीण परिस्थितीत बेड आणि वैद्यकीय उपकरणे असलेले ट्रक्स दिल्लीहून हिमाचल प्रदेशातील थिओग आणि रोहरू येथे पाठवण्यात आले. काल संध्याकाळी हा ट्रक तिथे पोहोचला”, असे युवराजने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले. युवराजने केलेल्या मदतीबद्दल त्याच्या चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maratha Reservation; शिवसंग्रामच्या विनायक मेटेंचा एल्गार; पुण्यातून आंदोलनाची दिशा ठरवणार

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये,कृषी अधिकाऱ्याच शेतकऱ्यांना आवाहन