in

एकही सुट्टी न घेता 365 दिवस चालणारी जिल्हा परिषद शाळा

गोपाल व्यास | वाशिम | शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का असं म्हणत सुट्टी मारायचा एकही मोका विद्यार्थी सोडत नाहीत, मात्र वाशिम जिल्ह्यातील नावली येथील शाळा इतकी भन्नाट आहे, कि या शाळेला 365 दिवस एकही सुट्टी नसते. ही शाळा वर्षाचे 365 दिवस हाऊसफुल असते. मात्र कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून ही शाळा बंद होती. 365 दिवस चालणारी राज्यातील एकमेव शाळा म्हणून या शाळेची ओळख निर्माण झाली आहे. तर राज्यातील एकमेव शाळा असण्यासोबतच वर्षभरात शिक्षकाने एकाही सुट्टी घेतली नसल्याचा विक्रम येथील शिक्षकांच्या नावे आहे.

वाशिम जिल्ह्यात मात्र नावली येथील जिल्हा परिषद शाळेचे वेगळेच चित्र दिसत आहे, जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांना हाऊसफुल्लचा बोर्ड लावण्याची वेळ आली आहे. कारण पटसंख्या पेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेत आहे. तसेच या शाळेला केवळ डिजिटल होण्यापुरता सहभाग न घेता शिक्षकांसोबत खांद्याला खांदा लावून विद्यार्थ्यांच्या विकासा करिता वाट्टेल ते करण्याची जिद्दही येथील ग्रामस्थांची आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नसल्याने गावकऱ्यांच्या सहकार्याने व शिक्षक वर्गानी या शाळेचे वर्ग चक्क मंदिरात व बौद्ध विहारमध्ये भरवून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जातात.

विद्यार्थ्यांनी सांगीतलं आहे की, “आमची शाळा 365 दिवस चालू असते मात्र कोरोनामुळे आमची शाळा बंद होती त्यामुळं आमचं शैक्षणिक नुकसान झालं आहे. आम्ही सर्व कोरोना नियमांचे पालन करून शाळेत येत आहोत. आता सरकारकडे आमची एकच मागणी आहे. “शाळा बंद पडू देऊ नका जीव गेला तरी चालेल पण शिक्षण थांबले नाही पाहिजे.आमची पुन्हा पहिल्या सारखी शाळा जी आहे. तशीच चालू असावी” अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IND vs NZ 2nd Test Day 1 : मयंक अग्रवालचं शतक, भारताची 4 बाद 214 पर्यंत मजल

कल्याणच्या रिसॉर्टमध्ये कर्मचाऱ्यानेच केली चोरी