in

Zomatoची सर्व फूड डिलीव्हरी वाहनं होणार इलेक्ट्रिक

ऑनलाईन फूड डिलीव्हरी कंपनी झोमॅटोने 2030 पर्यंत आपल्या सर्व फूड डिलीव्हरी व्हिकल्स इलेक्ट्रिक व्हिकल्समध्ये कनव्हर्ट करणार असल्याचं सांगितलं आहे. 2030 पूर्वीच कंपनीमध्ये फूड डिलीव्हरी आणि इतर कामांसाठी वापरण्यात येणारी सर्व वाहनं इलेक्ट्रिक होणार आहेत. कंपनीचे को-फाउंडर दीपेंदर गोयल यांनी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू सारख्या शहरांत कंपनी आधीपासूनच Electric Vehicles चा वापर करत असल्याच सांगितलं.

कंपनी EV100 ग्लोबल इनिशिएटिव्ह जॉईन करेल, ही जागतिक स्तरावर कंपन्या आपल्या सर्व फ्लिट इलेक्ट्रिक व्हिकल्समध्ये स्विच करण्याची मोहिम आहे. या मोहिमेंतर्गत आमच्या 100 टक्के फ्लिट 2030 पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक होतील. अशी माहिती झोमॅटोकडून मिळत आहे.

Zomato ने, Electric Vehicle सेक्टरमध्ये कंपनी अनेकांशी चर्चा करत असल्याचं सांगितलं. जेणेकरुन याचं पायलट डिझाईन करण्यासह बिजनेस मॉडेल क्रिएट केलं जाईल. ज्यामुळे फूड डिलीव्हरीसाठी वेगवान इलेक्ट्रिक मॉबिलिटी शक्य होईल. इलेक्ट्रिक वाहनांशिवाय Zomato यावर्षी आपला IPO लाँच करणार असून यासाठी कंपनीने SEBI कडे अर्जही केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Farmer MSP | खरीप हंगामाच्या तोंडावर केंद्राचा MSP संदर्भात मोठा निर्णय

पिंपरी चिंचवडमध्ये ऑक्सिजन टॅंक लिक