लोकशाही न्यूज नेटवर्क
मराठी चित्रपटसृष्टी नेहमीच वेगवेगळे विषय हाताळून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. असाच जरा हटके विषय घेऊन ‘झोंबिवली’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

अभिनेता ललित प्रभाकरनं याचं पोस्टरही आपल्या सोशल मिडिया अकाऊंटला पोस्ट केलं आहे. मराठीतला पहिला झॉम्बी सिनेमा – ‘झोंबिवली’!!!! टीझर येत आहे उद्या, ते पोहोचतीलच, तुमच्या दारापर्यंत अशा कॅप्शनसह त्याने या सिनेमाविषयी आपल्या चाहत्यांना सांगितलं. ३० एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा झोम्बी या कल्पनेवर आधारित आहे. ‘झोंबिवली’ चित्रपटाच्या टीझरवरून हा भयपट असेल असा अंदाज आपण बांधू शकतो.
आत्तापर्यंत गेम्समध्ये, हॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहिलेले झोम्बीज मराठी चित्रपटातही पाहायला मिळणार आहेत. रोमँटिक, जॉली भूमिका केलेले मराठी चेहरे हॉरर भूमिकेत दिसतील का हे पाहण्यासाठी मात्र 30 एप्रिलची वाट पाहावी लागेल. चित्रपटातील त्रिकुटाने अर्थात अभिनेता अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी एक फोटो पोस्ट करत चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली आहे.
Comments
Loading…